• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘हवामान बदल कामगिरी निर्देशांक (Climate Change Performance Index - CCPI) २०२१ ’ मध्ये भारत १० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • भारताची एकूण गुणसंख्या ६३.९८ इतकी आहे.

  • ५८ अर्थव्यवस्थांमधील उच्च हवामान कामगिरीसह भारत पहिल्या १० देशांमध्ये सलग दुसऱ्यांदा समाविष्ट झाला आहे.

  • गत वर्षी सदर निर्देशांकात भारत ९ व्या स्थानावर होता.

  • CCPI २०२० प्रमाणेच २०२१ च्या क्रमवारीत पहिली तिन्ही स्थाने अबाधित राहिली आहेत कारण कोणताही देश पॅरिस हवामानाच्या लक्ष्यांशी सुसंगत कार्य करू न शकल्यामुळे जागतिक तापमानवाढ २ किंवा १.५ डिग्री सेल्सियसच्या खाली मर्यादित ठेवण्यासाठी धोरण राबवित आहे.

क्रमवारीतील देश

  • स्वीडन (चौथा)

  • युनायटेड किंगडम (५ वा)

  • डेन्मार्क (६ वा)

  • मोरोक्को (७ वा)

  • नॉर्वे (८ वा)

  • चिली (९ वा)