-
छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. भूपेश बाघेल यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त 'इंदिरा वन मितान योजना' सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ठळक मुद्दे
-
छत्तीसगडमधील वनवासींना आधार देण्याकरिता तसेच स्वावलंबन प्राप्त करण्याचा हा उपक्रम आहे.
-
छत्तीसगडमधील अनुसूचित भागातील १९ लाख कुटुंबांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
छत्तीसगड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: भूपेश बाघेल हे सध्या छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल अनुसुइया उइके सध्या छत्तीसगडच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: रायपूर ही छत्तीसगड राज्याची राजधानी आहे.