-
कर्नाटक बँकेमार्फत 'कासा म्हणजेच चालू खाते बचत खाते (Current Account Savings Account - CASA)' एकत्रितता अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
६५० कोटी रुपयांच्या उलाढालीसह जवळपास ४.१० लाख चालू आणि बचत खाती जमा करण्याचा विचार असल्याचे बँकेमार्फत घोषित करण्यात आले आहे.
-
सदर मोहिमेसह बँकेने डिजीटली समर्थित बचत आणि चालू खाते उत्पादनांची आकर्षक आणि उत्कृष्ट बाब आपल्या ग्राहकांना सादर करण्याचा विचार केला आहे.
कर्नाटक बँक लिमिटेडबाबत महत्वपूर्ण माहिती
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: महाबळेश्वर एम. एस. हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मंगलुरू, कर्नाटक हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: फेब्रुवारी १९२४ मध्ये सदर बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
बँकेची टॅगलाईनः ‘Your Family Bank Across India’ ही बँकेची टॅगलाईन आहे.