• भूटानमधील भारताच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या मंगडेछू जलविद्युत प्रकल्पाला नुकतेच 'ब्रूनेल पदक (Brunel Medal) २०२०' ने गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार हा यूकेमधील अव्वल अभियांत्रिकी संस्था असणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्समार्फत (Institute of Civil Engineers) प्रदान करण्यात आलेला आहे.

मंगडेछू जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मध्य-भूटानमधील ट्रोंगा जोन्गखॅग जिल्ह्यातील मंगडेछू नावाच्या नदीवर ७२० मेगावॅट (MW) शक्तीचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

  • सदर प्रकल्प हा ४५०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आlलेला आहे.

  • पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौर्‍यावेळी ऑगस्ट २०१९ मध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्तपणे सदर प्रकल्पाचे उद्घाटन केले होते.