• भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यामार्फत 'National Security Challenges: Young Scholars’ Perspective' हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रकाशन लष्कराचा विचारगट असणाऱ्या जमीन युद्ध अभ्यास केंद्र (Centre for Land Warfare Studies - CLAWS) द्वारा करण्यात येणार आहे.

  • सदर पुस्तकात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित विविध थीम अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

  • देशातील तरुणांमध्ये सामरिक विचार विकसित करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • या पुस्तकाची रचना म्हणजे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे रणनीतीकार असणाऱ्या फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांना श्रद्धांजली स्वरूप आहे ज्यामुळे बांग्लादेश मुक्ती संपन्न झाली होती.