• पहिल्या भारतीय ऑस्कर पुरस्कार विजेत्या बनण्याचा मान मिळवणाऱ्या भानू अथैया यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९८२ मध्ये रिचर्ड अ‍ॅटेनबरो दिग्दर्शित 'गांधी' चित्रपटासाठी त्यांनी 'सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार साठीचा ऑस्कर पुरस्कार (Best Costume Design Oscar)' जिंकला होता.

  • २०१२ साली अथैया यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव 'अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसला (Academy of Motion Picture Arts and Sciences)' आपला ऑस्कर पुरस्कार परत केला होता.

उल्लेखनीय कार्य आणि मिळालेले पुरस्कार

  • बॉलिवूडच्या जवळपास १०० चित्रपटांकरिता त्यांनी वेशभूषाकार म्हणून उल्लेखनीय रचना केली होती.

  • ५ दशकांहून अधिक काळ त्यांनी आपली कारकीर्द गाजवली होती.

  • १९९० साली गुलजार यांच्या 'लेकिन' साठी आणि २००१ साली आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' या चित्रपटांसाठी त्यांनी २ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते.