-
बायर्न म्यूनिचचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवँडोव्स्की (Robert Lewandowski) याला 'सर्वोत्कृष्ट फिफा पुरूष खेळाडू (The Best FIFA Men’s Player) २०२०' आणि मॅनचेस्टर सिटीची खेळाडू ल्युसी ब्रॉन्झ (Lucy Bronze) ला 'सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू (The Best FIFA Women’s Player) २०२०' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
गत वर्षीचे विजेते ठरलेल्या लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मात देत 'सर्वोत्कृष्ट फिफा पुरूष खेळाडू २०२०' वर रॉबर्ट लेवँडोव्स्की याने शिक्कामोर्तब केले आहे.
-
ल्युसी ब्रॉन्झ हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला इंग्लिश खेळाडू ठरली आहे.
-
लेवँडोव्स्की आणि ब्रॉन्झ या दोघांसाठी हा पुरस्कार मिळविण्याची पहिलीच वेळ आहे.
FIFA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FIFA म्हणजेच Fédération Internationale de Football Association अर्थात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना होय.
-
अध्यक्ष: जियानी इन्फॅंटिनो हे सध्या FIFA च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापन करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: झुरिच, स्वित्झर्लंड हे FIFA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यत्व: २११ राष्ट्रीय संघटना FIFA च्या सदस्य आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'For the Game. For the World.' हे सदर संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.