-
महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून दिल्लीचे उपमुख्यमंत्री श्री. मनीष सिसोदिया यांच्यामार्फत व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या माध्यमातून 'बापू - द अनफरगेटेबल (Bapu - The unforgettable)' नावाच्या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
दिल्ली पुराभिलेख व कला, संस्कृती आणि भाषा विभाग, दिल्ली सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
सदर विभागामार्फत विशेष वेबिनारचे देखील आयोजन करण्यात आले होते.
पुस्तकाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
वाचक वर्गाला 'बापू - द अनफरगेटेबल' हे पुस्तक महात्मा गांधीजी यांची विचारधारा व तत्त्वज्ञान यांची ओळख करून देईल अशी अपेक्षा आहे.
-
सदर पुस्तकात अनेक अस्पर्शी स्वरूपाच्या ऐतिहासिक बाबी, दुर्मिळ छायाचित्रे, मुद्रालेख आणि दिल्लीविषयी काही तपशील यांचा समावेश करण्यात आला आहे.