-
बांग्लादेशच्या प्रस्तावानंतर युनेस्कोमार्फत बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी मंडळामार्फत २१० व्या अधिवेशनात 'सर्जनशील अर्थव्यवस्था (Creative Economy)' साठी युनेस्को - बांग्लादेश बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंबंधीचा प्रस्ताव एकमताने स्विकारण्यात आला आहे.
-
बंगबंधू यांच्या नावाने प्रथमच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.