• केंद्रीय कृषीमंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते नुकतीच 'आयुष्मान सहकार (AYUSHMAN SAHAKAR)' नावाची योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • देशभरातील मूलभूत आरोग्य सेवा - सुविधांच्या निर्मितीकार्याला सहकार्य करणे हा उपयुक्त उद्देश या योजनेच्या माध्यमातून साध्य करणे शक्य आहे.

आयुष्यमान सहकारबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत (National Cooperative Development Corporation - NCDC) आयुष्मान सहकार योजना तयार करण्यात आली आहे.

  • NCDC ची सदर योजना ही केंद्र सरकारतर्फे शेतकरी कल्याणाचे कार्य बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असेल अशी अपेक्षा आहे.

  • ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये बदल घडविणे हे आयुष्मान सहकार योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.