-
खाजगी क्षेत्रातील कर्जदाता अॅक्सिस बँकेने एक स्वयंचलित ध्वनी सहाय्यक ‘AXAA’ सुरू केला आहे. हा ऑटोमेटेड व्हॉईस असिस्टंट एक अर्धमानवासारखे कार्य करेल आणि पारंपारिक आंतरिक ध्वनी प्रतिसाद सुविधेच्या (Interactive Voice Response - IVR) माध्यमातून ग्राहकांच्या अनुभवाचे प्रतिमान बदलण्याची क्षमता प्रदान करेल.
ठळक मुद्दे
-
‘AXAA’ एक कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित संभाषण ध्वनी बोट (BOT) असून त्याद्वारे इंग्रजी, हिंदी आणि हिंग्लिशमध्ये संभाषण करणे शक्य आहे.
-
'AXAA' मध्ये दररोज एक लाख ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आणि विनंत्या सोडवण्याची क्षमता आहे.
अॅक्सिस बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी हे सध्या अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विराजमान आहेत.
-
बँक स्थापना वर्ष: १९९३ साली अॅक्सिस बँकेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालय ठिकाण: अॅक्सिस बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.