• रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत (Reserve Bank of India - RBI) जयपूरमध्ये स्वयंचलित बँक नोट प्रक्रिया केंद्र (Automated Banknote Processing Centre - ABPC) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ABPC च्या कामांमध्ये बँक शाखांकडून प्राप्त झालेल्या नोटांवरील प्रक्रिया आणि स्वयंचलित पद्धतीने मलीन नोटा नष्ट करणे या बाबींचादेखील समावेश असेल अशी अपेक्षा आहे.

  • मार्च २००१ ते मार्च २०१९ या कालावधीत चलनात असलेल्या नोटांच्या प्रमाणात तिप्पट वाढ झाली आहे.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.