• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र ‘देह वेचावा कारणी’ (अर्थ: एका भल्या कार्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणे) या नावाने प्रकाशित करण्यात आले आहे.

  • २०१६ साली वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले होते.

  • लोकसभेचे सदस्य म्हणून डॉ. पाटील यांनी अनेक वेळा कार्यभार सांभाळला आहे.

  • त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांच्या हस्ते 'प्रवरा ग्रामीण शिक्षण सोसायटी'चे नाव बदलून ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण सोसायटी’ असे करण्यात आले आहे.

  • ग्रामीण भागातील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मुलींना सक्षम बनविण्याच्या उदात्त हेतूपूर्तीसाठी सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.