-
आपल्या बडोदा सुवर्ण कर्जाचा एक भाग म्हणून बँक ऑफ बडोदामार्फत (Bank of Baroda - BoB) नुकतीच आत्मनिर्भर महिला सुवर्ण योजना (Atmanirbhar Women Gold Scheme) सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतातील स्वावलंबी महिलांना लक्ष्य करणे हे सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
सदर योजनेंतर्गत बँकेतर्फे महिलांकरिता ०.५० टक्के सवलतीत कर्जपुरवठा करण्यात येत आहे.
-
सुवर्ण कर्ज योजनेंतर्गत बँक कृषी-सोने कर्ज ०.२५ टक्के सवलतीत आणि किरकोळ कर्ज ०.५० टक्के सवलतीत देत आहे.
-
बँक ऑफ बडोदाची ही आत्मनिर्भर योजना केवळ महिलांना स्वावलंबी होण्यास मदत करण्यासाठी आहे.
बँक ऑफ बडोदा बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: वडोदरा, गुजरात हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: हसमुख अधिया सध्या बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संजीव चड्ढा हे सध्या या पदावर कार्यरत आहेत..
-
स्थापना वर्ष: २० जुलै १९०८ रोजी बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थापक: सयाजीराव गायकवाड तिसरे हे बँक ऑफ बडोदाचे संस्थापक आहेत.