-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘असोचॅम स्थापना सप्ताह (ASSOCHAM Foundation Week) २०२०’ ला संबोधित करताना ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा 'असोचॅम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी (ASSOCHAM Enterprise of the Century) पुरस्काराने' सन्मान केला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सप्ताहाचे आयोजन १५ ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान करण्यात आले होते.
-
‘भारताची लवचिकता: ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या दिशेने आत्मनिर्भर मार्गक्रमण (India’s resilience: Atmanirbhar roadmap towards $५ trillion economies)’ ही या सप्ताहाची थीम होती.
-
सदर उत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाटा समूहाच्या वतीने देशासाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल श्री. रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी पुरस्कार’ प्रदान केला.