• आसाम सरकार 'अरुणोदय' नावाच्या नवीन योजनेअंतर्गत लाभार्थींची ओळख पटवणार आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणास मदत करण्यासाठी ही महत्वपूर्ण योजना सुरू केली जात आहे.

ठळक मुद्दे

  • 'अरुणोदय' ही आसाममधील सर्वात मोठी योजना असेल ज्याचा फायदा १७ लाखांहून अधिक कुटुंबांना होईल अशी अपेक्षा आहे.

  • सदर योजनेचे आर्थिक विकासाला चालना देताना महिलांचे सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • आसाम राज्य सरकारने नवीन योजनेसाठी २८० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

आसामबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: श्री. सर्वानंद सोनोवाल हे सध्या आसामच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: श्री. जगदीश मुखी हे सध्या आसामच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्य दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: दिसपूर ही आसामची राजधानी आहे.

  • अधिकृत भाषा वापर: आसामीज भाषेचा वापर आसामची अधिकृत भाषा म्हणून करण्यात येतो.