-
आशियाई चित्रपट पुरस्कार अकादमीमार्फत (Asian Film Awards Academy) आशियाई चित्रपट पुरस्कारांच्या (Asian Film Awards) १४ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे
-
भारतीय चित्रपट 'गली बॉय' ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरचा (Best Original Score) पुरस्कार मिळाला आहे.
-
झोया अख्तर यांनी गली बॉय चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर यामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: ली बायंग - हू - द मॅन स्टँडिंग नेक्स्ट (दक्षिण कोरिया)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: झोउ डोंग्यू - बेटर डेज (चीन)
-
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: डोंग जिनसोंग - द वाइल्ड गूज लेक
-
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार: पाचरीन सुरवातानापोंग्स - हॅपी ओल्ड ईयर
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: वांग झिओशुवाई, सो लॉंग, माय सन (चीन)
-
सर्वोत्कृष्ट एडिटींग : यांग जिन - मो - पॅरासाईट
-
सर्वोत्कृष्ट चित्रपट: पॅरासाईट (दक्षिण कोरिया)
-
सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार: जॅक्सन यी - बेटर डेज
-
सर्वोत्कृष्ट नूतन दिग्दर्शक: हिकारी - ३७ सेकंद
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: ऱ्यो केसे - टू द एंड्स ऑफ द अर्थ
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: को शु - चिन - अ सन
-
सर्वोत्कृष्ट पटकथा: बोंग जून-हो, हान जिन - वोन - पॅरासाईट
-
सर्वोत्कृष्ट ओरिजनल संगीत: कार्ष काळे, द साल्व्हेज ऑडिओ कलेक्टिव - गली बॉय
-
सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन: हा - जून ली - पॅरासाईट
-
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स: टोमी किजो, रेनोव्हॅटिओ पिक्चर्स - डीटेंशन
-
सर्वोत्कृष्ट ध्वनी: योशीफुमी कुरेषी - लिसन टू द युनिव्हर्स