-
सिडनी-आधारित लोवी संस्थेमार्फत (Lowy Institute) जाहीर करण्यात आलेल्या 'आशिया पॉवर इंडेक्स (Asia Power Index) २०२०' क्रमवारीमध्ये १०० पैकी ३९.७ गुणांसह भारत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर निर्देशांकामध्ये आशियाई राज्यांच्या सापेक्ष शक्तीचे आकलन करण्याच्या उद्देशाने २६ देश आणि प्रांत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
-
८१.६ गुणांसह आशिया-पॅसिफिकवर परिणाम करणारा सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिकेने आपले स्थान अबाधित राखले आहे.
-
अमेरिकेच्या खालोखाल ७६.१ गुणांसह चीन दुसर्या तर ४१ गुणांसह जपान तिसर्या क्रमांकावर विराजमान आहे.