• भारतातील प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना प्रतिष्ठित 'एशिया गेम चेंजर पुरस्कार (Asia Game Changer Award) २०२०' ने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड-१९ महामारीच्या काळात देशभरातील कोट्यवधी लोकांना त्यांनी त्यांच्या खाद्य वितरण मोहीम ‘फीडइंडिया (FeedIndia)’ च्या माध्यमातून खाण्यापिण्याची सोय केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

  • आघाडीच्या संस्थेमार्फत नामांकित पुरस्कार प्राप्त ६ सन्मानार्थी अर्थात BTS, विकास खन्ना, मिकी ली, यो-यो मा, नाओमी ओसाका, जो आणि क्लेरा त्साई यांमध्ये ते एकमेव भारतीय आहेत.

'आशिया गेम चेंजर पुरस्काराबाबत (Asia Game Changer Award)' महत्वपूर्ण माहिती

  • सुरुवात वर्ष: २०१४ साली आशिया सोसायटीतर्फे 'आशिया गेम चेंजर पुरस्कार' सुरू करण्यात आला होता.

  • पुरस्कार मुख्य उद्देश: आशियाच्या भविष्यकालीन प्रगतीमध्ये सकारात्मक योगदान देणार्‍या नेत्यांची ओळख पटविणे व त्यांचा सन्मान करणे या मुख्य उद्देशांकरिता या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.