• अन्न व कृषी संघटनेचे (Food and Agriculture Organization - FAO) ३५ वे आशिया आणि पॅसिफिक २०२० साठीचे क्षेत्रीय परिषदेचे सत्र कोविड-१९ च्या साथीच्या आजारामुळे व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आले.

ठळक मुद्दे

  • आयोजक देशाची भूमिका बजावणाऱ्या भूतानच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.

  • केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री. परषोत्तम रुपाला यांनी सदर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • सदर परिषदेद्वारे प्रादेशिक प्राधान्यक्रम आणि मुद्द्यांवर जसे की कोविड-१९, कृषी राज्य, नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, अन्न सुरक्षा आणि पोषण इ. वर लक्ष केंद्रित केले गेले.

  • २०२२ मध्ये बांगलादेश आशिया आणि पॅसिफिकच्या ३६ व्या क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करणार आहे.

  • प्रादेशिक परिषद दर २ वर्षांनी एकदा आयोजित करण्यात येते.

  • १९५३ साली बंगळुरू येथे पहिल्यांदा प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती.

अन्न व कृषी संघटनेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • प्रमुख अधिकारी: क्यू डोंग्यू हे सद्या प्रमुख अधिकारी पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १६ ऑक्टोबर १९४५ रोजी संघटनेची स्थापना झाली होती.

  • संघटनेचा प्रकार: संयुक्त राष्ट्रांची विशेष संघटना असे या संस्थेचे स्वरूप आहे.