• केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. गजेंद्रसिंग शेखावत यांच्यामार्फत अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिल्या सौर-आधारित एकात्मिक मल्टी-व्हिलेज पाणीपुरवठा प्रकल्पाचे (Integrated Multi-Village Water Supply Project - IMVWSP) अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदरचा सौर-आधारित उपसा पाणीपुरवठा प्रकल्प हा सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेला देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे.

अरुणाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: पेमा खंडू हे सध्या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: बी. डी. मिश्रा हे सध्या अरुणाचल प्रदेशच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • केंद्र शासित प्रदेश दर्जा: २१ जानेवारी १९७२ रोजी अरुणाचल प्रदेशला केंद्र शासित प्रदेशचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राज्य दर्जा: २० फेब्रुवारी १९८७ रोजी अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: इटानगर ही सध्या अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने अरुणाचल प्रदेश राज्याचा देशात १४ वा क्रमांक लागतो.