• कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यामार्फत ३९३०० कोटी रुपयांचे कर्ज विविध सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यासाठी 'आर्थिक स्पंदन (Arthika Spandana)' या नावाने कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राला १५३०० कोटी रुपये वितरित केले जातील तर बिगर शेती क्षेत्रासाठी २४००० कोटी रुपये राखून ठेवले जातील अशी अपेक्षा आहे.

  • कोविड-१९ आणि पूर स्थितीमध्ये लोकांना मदत केल्याबद्दल त्यांनी सहकारी संस्थांचे कौतुक केले.

कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.