-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील केवडिया येथे 'आरोग्य वन (Arogya Van)' चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'जंगल सफारी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केवडियामधील सरदार पटेल प्राणीशास्त्र उद्यानाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी सदर दौऱ्यामध्ये केले.
-
याव्यतिरिक्त त्यांनी केवडिया येथील मुलांसाठी पोषण पार्क असलेल्या 'एकता मॉल' चे उद्घाटनही केले.
आरोग्य वनबाबत महत्वपूर्ण माहिती
-
सदर वनाद्वारे जवळपास १७ एकराचे क्षेत्र व्यापले गेले आहे.
-
निवडक स्वरूपाच्या सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रजाती या वनामध्ये अस्तित्वात आहेत.
-
औषधी वनस्पतींचा वापर व त्याचे महत्त्व याविषयी वनाच्या माध्यमातून माहिती पुरवण्यात येते.