-
जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांना २०२१ सालचा 'आर्लिन पाश्च ग्लोबल व्हिजन पुरस्कार (Arline Pacht Global Vision Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश संघटनेच्या (International Association of Women Judges - IAWJ) द्वैवार्षिक परिषदेत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
-
मेक्सिकोच्या मार्गारिटा ल्यूना रामोसबरोबर त्यांनी हा सन्मान सामायिकरित्या जिंकला आहे.
-
IAWJ मार्फत २०१६ मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता.
-
न्यायमूर्ती मित्तल या हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय न्यायाधीश ठरल्या आहेत.