• स्वायत्त संशोधन व मूल्यांकन संस्था प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे (Pratham Education Foundation) ग्रामीण भारतासाठी वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल (The Annual Status of Education Report - ASER) नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यावर्षी सदर सर्वेक्षण हे फोन कॉलद्वारे करण्यात आले आहे.

  • २६ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सदर सर्वेक्षण करण्यात आले आहे.

  • ५ ते १६ वर्षे या वयोगटातील सुमारे ५२२२७ घरे आणि ५९२५१ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

  • सुमारे ८९६३ शिक्षक व प्राध्यापकांचे सर्वेक्षणही याद्वारे करण्यात आले आहे.

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

  • पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४७.४ टक्के मुलांमार्फत स्मार्टफोनचा वापर करण्यात आला.

  • जम्मू काश्मीरमध्ये ७७.१ टक्के मुले स्मार्टफोनचा वापर करतात.

  • पंजाबमध्ये ८८ टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये ९० टक्के तर हरियाणामध्ये ८२.३ टक्के मुलांनी स्मार्टफोनचा वापर केला.

  • सदर यादीमध्ये केरळ ९४.३ टक्क्यांसह अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

  • सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की ग्रामीण भागातील सुमारे २० टक्के मुलांनी पाठ्यपुस्तकांचा वापर केला नव्हता.

  • आंध्र प्रदेशमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा कमी मुलांनी पाठ्यपुस्तकांचा वापर केला होता.

  • पूर्व भारतात उत्तम कामगिरी करण्यात आली होती. यामध्ये पश्चिम बंगाल, नागालँड आणि आसामसारख्या राज्यांमधील ९८ टक्क्यांपेक्षा जास्त मुलांनी पाठ्यपुस्तकांचा वापर केला होता.

  • साधारणपणे ३ ग्रामीण मुलांमागे एका मुलाने शिकण्याच्या क्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला नव्हता.

  • ६-१० वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ३ टक्के मुलांनी अद्याप शाळेत प्रवेश घेतला नव्हता.