-
अॅनेमिया मुक्त भारत (Anemia Mukt Bharat - AMB) निर्देशांकातील हरियाणा राज्य हे देशातील अव्वल स्थानावर विराजमान होणारे राज्य ठरले आहे.
ठळक मुद्दे
-
AMB निर्देशांकात ४६.७ गुणांसह हरियाणा पहिल्या स्थानावर विराजमान झाले आहे.
-
हरियाणा हे देशातील अशा ११ राज्यांपैकी एक आहे जी २०२० पूर्वी राष्ट्रीय आरोग्य धोरणांचे (National Health Policy) लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरली आहेत.
अॅनेमिया मुक्त भारतबाबत (Anemia Mukt Bharat - AMB) महत्वपूर्ण माहिती
-
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) आणि युनिसेफ (UNICEF) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
-
संपूर्ण भारतभर दुर्बलणाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
-
पोषण अभियानांतर्गत अशक्तपणा कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त स्वरूपाचा कार्यक्रम आहे.
हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: सत्यदेव नारायण आर्य हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.