-
‘ई-रक्षाबंधन’ नावाचा अभिनव आभासी सायबर गुन्हेगारी जागरूकता कार्यक्रम आंध्र प्रदेश सरकारमार्फत सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे हे सदर कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
ठळक मुद्दे
-
संपूर्ण महिन्याभराचा कालावधी असणाऱ्या या ऑनलाइन जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन गुन्हे अन्वेषण विभाग (Crime Investigation Department - CID), सायबर पीस फाउंडेशन (Cyber Peace Foundation), एफएम रेडिओ, महिला आणि मुलांविरूद्ध सायबर गुन्हेगारी प्रतिबंध (Cyber Crime Prevention Against Women and Children - CCPWC) आणि इतर संस्था करणार आहेत.
आंध्र प्रदेशबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: वाय.एस. जगन मोहन रेड्डी हे सध्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बिस्वा भूषण हरीचंदन हे सध्या आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.
-
विशेषता: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील ७ वे मोठे राज्य आहे.
-
अधिकृत भाषा: तेलुगू या भाषेचा अधिकृत भाषा म्हणून वापर करण्यात येतो.