• भारतीय लष्कर व महाराष्ट्र पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे 'सुरक्षा कवच (Suraksha Kavach)' या दहशतवादविरोधी सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे

  • पुण्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादी कारवायांचा प्रतिकार करण्यासाठी दहशतवादविरोधी जलद प्रतिक्रिया संघ (Quick Reaction Teams - QRT) सक्रिय करण्यासाठी सैन्य आणि पोलिस या दोहोंच्या कवायती आणि कार्यपद्धती यामध्ये एकसूत्रता आणणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.

  • सदर सरावामध्ये QRT, श्वान पथके, लष्कर बॉम्ब डिस्पोजल संघ तसेच दहशतवादविरोधी पथक (Anti-Terrorism Squad - ATS) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या QRT यांनी आपला सहभाग नोंदवला होता.

  • सदर सरावामुळे सैन्य आणि पोलिस यांना कवायत आणि कार्यपद्धती यामध्ये सहकार्य तसेच योग्य समन्वय साधणे शक्य झाले.