-
विझिकीच्या BFSI मूव्हर्स आणि शेकर्स (BFSI Movers and Shakers) २०२० च्या अहवालानुसार HDFC बँक देशातील १०० बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (Banking, Financial Services and Insurance - BFSI) कंपन्यांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे
-
HDFC बँक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक सेवा, चलन व्यवस्थापन अशा विविध नाविन्यपूर्ण बाबींमुळे अव्वल स्थानावर आहे.
-
ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ( (State Bank of India - SBI) अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर विराजमान आहेत.
-
२०२० च्या सदर अहवालात इतर १० प्रमुख बँकांमध्ये येस बँक, PNB, HSBC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, ड्यूश बँक आणि IDBI समाविष्ट झाल्या आहेत.
इतर श्रेणींमधील विजेते
-
वॉलेट आणि UPI विभागः गुगल पे (Google Pay)
-
निओ (Neo) बँक विभाग: योनो (YONO)
-
पेमेंट्स बँक श्रेणी: एअरटेल पेमेंट्स बँक (Airtel Payments Bank)
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.