• अखिल भारतीय फुटबॉल महासंघामार्फत (All India Football Federation - AIFF) नुकतेच २०१९-२० सालासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

  • भारतीय पुरुष संघाचा गोलकीपर गुरप्रीत सिंग संधूने पुरुषांच्या गटात सन २०१९-२० साठीचा 'AIFF प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे.

  • हरियाणा येथील महिला संघाची मिडफिल्डर संजू यादवने महिलांच्या गटात सन २०१९-२० साठीचा 'AIFF प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे.

पुरस्कारांची संपूर्ण यादी

  • वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूः गुरप्रीतसिंग संधू

  • वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूः संजू यादव

  • वर्षातील उदयोन्मुख फुटबॉलपटू (पुरुष गट): अनिरुद्ध थापा

  • वर्षातील उदयोन्मुख फुटबॉलपटू (महिला गट): रतनबाला देवी

  • सर्वोत्कृष्ट पंच पुरस्कारः एल. अजितकुमार मेटेयी

  • सर्वोत्कृष्ट सहायक पंच पुरस्कारः पी. वैरा-मुथु

AIFF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AIFF म्हणजेच All India Football Federation अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघ होय.

  • अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल हे सध्या AIFF च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १९३७ साली AIFF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: द्वारका, दिल्ली हे AIFF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.