• दिग्गज मल्याळम कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असणाऱ्या कवी अकीथम अचूथन नंबूथीरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • वयाच्या ९४ व्या वर्षी नंबूथीरी यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • कविता, नाटके, निबंध आणि लघुकथांसह त्यांनी ४६ हून अधिक प्रकारचे साहित्य लेखन केले आहे.

  • मल्याळम कवितेमध्ये आधुनिकतेचा परिचय निर्माण करण्यात अकीथम यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

  • १९७२ साली त्यांना 'बालदर्शनम्' साठी केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

अकीथम यांना मिळालेले पुरस्कार

  • ज्ञानपीठ पुरस्कार (२०१९)

  • पद्मश्री पुरस्कार (२०१७)

  • एझुठाचन पुरस्कार

  • वायलर पुरस्कार

  • ओडाकुझल पुरस्कार