-
एम्सचे (All India Institute of Medical Sciences - AIIMS) संचालक श्री. रणदीप गुलेरिया आणि इतर २ डॉक्टरांनी लिहीलेल्या 'टिल वी विन (Till We Win)' शीर्षकाच्या नवीन पुस्तकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
भारताच्या कोविड - १९ विरुद्ध लढायांबद्दल आणि आगामी काळात साथीच्या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल या पुस्तकाद्वारे माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
-
सार्वजनिक धोरण आणि आरोग्य यंत्रणेचे तज्ज्ञ श्री. चंद्रकांत लहरिया आणि नामांकित लस संशोधक तसेच विषाणूविज्ञ असलेल्या श्री. गगनदीप कांग यांनी सदर पुस्तकाचे एकत्रितपणे लेखन केले आहे.
-
'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (Penguin Random House India)' द्वारे सदर पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.