-
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. एन. व्ही. रामन्ना यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन यांच्या 'अॅनॉमलीज इन लॉ अँड जस्टीस (Anomalies in Law and Justice)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
कायदेशीर यंत्रणेमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक गंभीर विचारांची आवश्यकता सदर पुस्तक पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
-
निवडणूक सुधारणा कार्यपद्धती तसेच वैकल्पिक विवाद निराकरण यंत्रणेशी संबंधित मूलभूत कायदे विस्तृत स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न सदर पुस्तकात करण्यात आला आहे.