'जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमार्फत (World Intellectual Property Organization - WIPO)' नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक नाविन्य निर्देशांक (Global Innovation Index - GII)' २०२६ मध्ये भारत ३८ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर यादीमध्ये स्वित्झर्लंड ६६.७ गुणांसह सलग १६ व्या वर्षी अव्वल स्थानी कायम राहिला आहे.
  • जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने 'जागतिक नाविन्य निर्देशांक २०२६: विज्ञानाच्या सीमावर्ती क्षेत्रात उद्योजकांना सक्षम करणे (Global Innovation Index 2026: Powering entrepreneurs at the frontier of science)' या शीर्षकाखाली या निर्देशांकाची १९ वी आवृत्ती प्रकाशित केली आहे.
  • सदर निर्देशांकात भारताने ४०.१ इतक्या एकूण गुणांसह ३८ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

अव्वल देश - क्रमवारी:

  • १. स्वित्झर्लंड
  • २. स्वीडन 
  • ३. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA)

निम्न स्तर देश - क्रमवारी:

  • १३९. चाड
  • १३८. नायजर
  • १३७. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
  • १३६. अंगोला
  • १३५. बुरुंडी