नुकतेच केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 'सागर संवाद (Sagar Samvad)'च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'सागर संवाद'च्या पहिल्या आवृत्तीचे अध्यक्षपद भूषवले.
  • सदर आवृत्ती ही नवी दिल्लीतील विनय मार्ग येथील 'नागरी सेवा अधिकारी संस्थेमध्ये (Civil Services Officers Institute)' 'राष्ट्रीय जहाजवाहतूक मंडळ (National Shipping Board - NSB)' द्वारे आयोजित करण्यात आली होती.
  • कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यामार्फत NSB च्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
  • 'मॅरिटाइम इंडिया व्हिजन २०३० आणि मॅरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७ च्या दिशेने मार्गदर्शक आराखडा तयार करणे (Charting the Roadmap Towards Maritime India Vision 2030 and Maritime Amrit Kaal Vision 2047)' या मुख्य विषयावर 'सागर संवाद' हा कार्यक्रम आधारित होता.
  • या उद्देशाच्या मार्गदर्शक आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सागरी क्षेत्रातील संबंधित घटक, उद्योग प्रतिनिधी आणि तज्ज्ञांना ३ सत्रांमध्ये एकत्र आणणे हा याचा मुख्य उद्देश्य होता.

NSB विषयी महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): NSB म्हणजेच 'National Shipping Board' अर्थात 'राष्ट्रीय जहाजवाहतूक मंडळ' होय.
  • स्थापना वर्ष: 'मर्चंट शिपिंग ॲक्ट, १९५८' अंतर्गत १९५९ मध्ये NSB ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NSB चे मुख्यालय स्थित आहे.
  • संस्थेचे कार्यकारी प्रमुख: डॉ. मालिनी व्ही. शंकर (आयएएस) या सध्या संस्थेच्या कार्यकारी प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
  • वैशिष्ट्य: ही एक वैधानिक सल्लागार संस्था आहे.
  • मुख्य कार्य: भारत सरकारला जहाजबांधणी धोरण, जहाजांची क्षमता, खलाशांचे कल्याण आणि बंदरांशी संबंधित सागरी विकास यांबाबत सल्ला देण्याचे मुख्य कार्य ही संस्था करते.