मिझोराममार्फत नुकतेच ७९ स्मारके आणि पुरातत्वीय स्थळांना 'राज्य संरक्षित स्मारके (State Protected Monuments)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • 'मिझोराम प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा, २००१' अन्वये ७९ स्मारके आणि पुरातत्वीय स्थळांना मिझोराम सरकारने 'राज्य संरक्षित स्मारके' म्हणून घोषित केले आहे.
  • त्या प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य संरक्षित स्मारकांविषयी: 

  • चम्फाई जिल्ह्यातील २ स्मारकांना 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India - ASI)' अंतर्गत 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
  • वांगछिया (Vangchhia) गावातील 'काव्चुआह रोपुई' (Kawtchhuah Ropui) आणि 'रालवेन पुक' (Ralven Puk) तसेच लियानपुई (Lianpui) गावातील 'लियानपुई हमुन' (Lianpui Hmun) किंवा 'लुंगफुन रोपुई' (Lungphun Ropui) ही ती २ स्मारके आहेत.

संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित स्थळे:

  • ममित (Mamit) जिल्ह्यातील 'रेंग पुक' (Reng Puk) आणि 'लुंग मिलेम' (Lung Milem)
  • चम्फाई (Champhai) जिल्ह्यातील 'पिपुते लुंगदाव' (Pipute Lungdawh)
  • सैतुअल (Saitual) जिल्ह्यातील 'रुहरो पुक' (Ruhro Puk)