नुकतेच जपानच्या जपान क्रेडिट रेटिंग एजन्सीमार्फत (Japan Credit Rating Agency - JCRA) ३५ वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन (Sovereign Credit Rating) 'BBB+' वरून 'A-' पर्यंत सुधारले आहे.
ठळक मुद्दे:
- जपान क्रेडिट रेटिंग एजन्सीमार्फत (Japan Credit Rating Agency - JCRA) भारताचे सार्वभौम मानांकन 'BBB+' वरून 'A-' पर्यंत सुधारले आहे.
- सदर एजन्सीने देशाची देशाची कमाल पतश्रेणी मर्यादा (Country ceiling) देखील एका पातळीने वाढवून 'A' इतकी केली आहे.
महत्वपूर्ण तपशील:
- मजबूत आर्थिक विकास, प्रभावी धोरणे, ग्राहकांचा भक्कम खर्च व गुंतवणूक तसेच अधिक सक्षम आर्थिक प्रणाली या मुख्य कारणांमुळे JCR ने भारताचे मानांकन सुधारले आहे.
- २०२६-२७ या वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) विकास दर ६% पेक्षा जास्त राहील असा अंदाज JCR एजन्सीने वर्तवला आहे.
JCRA बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): JCRA म्हणजेच Japan Credit Rating Agency अर्थात जपान क्रेडिट रेटिंग एजन्सी होय.
- स्थापना वर्ष: एप्रिल १९८५ मध्ये JCRA ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: टोकियो, जपान येथे JCRA चे मुख्यालय स्थित आहे.