'कॅच द रेन' मोहिमेअंतर्गत जलशक्ती मंत्रालयाच्या 'JSJB 3.0' उपक्रमात छत्तीसगडने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ठळक मुद्दे:
- जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Jal Shakti’s - MoJS) 'कॅच द रेन' (Catch the Rain) मोहिमेचा एक भाग असलेल्या आणि लोकसहभागावर आधारित जलसंधारण कार्यक्रम - 'जल संचय जन भागीदारी' (Jal Sanchay Jan Bhagidari - JSJB 3.0) - च्या तिसऱ्या टप्प्यात छत्तीसगडने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे.
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्याचे मॉडेल सादर केले आहे.
छत्तीसगड जलसंधारण कामगिरीबद्दल महत्वपूर्ण माहिती:
- छत्तीसगडने नोंदणीकृत ७९,७७५ जलसंधारण संरचनांपैकी ७७,७१९ संरचनांचे काम पूर्ण करून मागील टप्प्यांमधील दुसऱ्या स्थानावरून प्रगती करत अव्वल स्थान गाठले आहे.
- राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्यापूर्वी छत्तीसगडने JSJB 1.0 मध्ये ४,०५,५६१ संरचनांसह आणि JSJB 2.0 मध्ये आपल्या सुरू केलेल्या २४,०७,४५६ संरचनांपैकी २३,०७,७६८ पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला होता.
- ३१ मे २०२७ पर्यंत २ कोटी नवीन जलसंधारण संरचना निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दृष्टीने छत्तीसगडचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.