• हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन ९ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. २०२० मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकमताने घेतलेल्या निर्णयानंतर सदर दिवसाची स्थापना करण्यात आली आहे.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनेस्को (UNESCO) आणि युनिसेफ (UNICEF) या संस्थांना संघर्षामुळे पिडीत देशांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी मुलांच्या दुर्दशेविषयी जागरूकता वाढविण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच हा दिवस साजरा करण्याचा विचार प्रबळ झाला.

  • सदर दिवसाची घोषणा करणारा ठराव कतार मार्फत ६२ सहप्रायोजित देशांसह सादर करण्यात आला होता.

युनेस्कोबाबत (UNESCO) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्था प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO चे संस्था प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना झाली होती.

युनिसेफबाबत (UNICEF) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी होय.

  • कार्यकारी संचालक: हेनरीटा एच. फोर सध्या UNICEF च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UNICEF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.