-
कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम (Legal Services Authorities Act) १९८७ च्या कायद्याच्या स्मरणार्थ सर्व विधी सेवा प्राधिकरणांकडून भारतात दरवर्षी ९ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय विधी सेवा दिन (National Legal Services Day)' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
कायदेशीर सेवांनुसार विविध तरतुदींबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
समाजातील दुर्बल घटकातील लोकांना विनामूल्य, कुशल तसेच कायदेशीर सेवा पुरविणे हे सदर दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय विधी सेवा दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
११ ऑक्टोबर १९८७ रोजी कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा १९८७ जाहीर करण्यात आला होता.
-
सदर कायदा नोव्हेंबर १९९५ मध्ये लागू करण्यात आला होता.
-
समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना मदत पुरवण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत १९९५ साली या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती.