• 'प्रवासी भारतीय दिवस (Pravasi Bharatiya Divas)' दरवर्षी ९ जानेवारी रोजी परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची दखल घेण्यासाठी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • परदेशस्थ भारतीय समुदायाच्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

  • अनिवासी भारतीय व्यक्तींना (NRI) भारताबाबतचे आपले मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना भारताच्या विकासात्मक कामांमध्ये सामील करून घेणे हे सदर दिवस साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'आत्मनिर्भर भारतासाठी योगदान (Contributing to Aatmanirbhar Bharat)' ही यंदाच्या १६ व्या प्रवासी भारतीय दिवस २०२१ ची थीम आहे.

प्रवासी भारतीय दिवसाबाबत महत्वपूर्ण माहिती 

  • ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते.

  • या दिवसाच्या स्मृतीसाठी भारत सरकारमार्फत प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो.

  • २०१५ साली सदर दिवस हा द्विवार्षिक घोषित करण्यात आला होता.