• संयुक्त राष्ट्रसंघामार्फत (United Nations - UN) दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी 'जागतिक स्वदेशी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of the World’s Indigenous Peoples)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगातील स्वदेशी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच जागतिक समस्या सुधारण्यासाठी स्वदेशी लोकांच्या योगदानाची दखल घेणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'कोणालाही मागे न राहू देणे: स्थानिक लोक आणि नवीन सामाजिक कराराची मागणी (Leaving no one behind: Indigenous peoples and the call for a new social contract)' ही यंदाच्या २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.