• 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day)' दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे आणि अधिक साक्षरतेच्या दृष्टीने असणाऱ्या प्रयत्नांच्या गरजेबाबत जागरूकता पसरविणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजीटल विभाजन संकुचित करणे (Literacy for a human-centered recovery: Narrowing the digital divide)' ही यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची थीम आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.