-
दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी 'भारतीय वायूसेना दिन (Indian Air Force Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदा २०२१ साली भारतीय हवाई दलाची ८९ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.
-
ब्रिटीशांमार्फत ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय हवाई दलाची अधिकृतपणे 'रॉयल इंडियन एअर फोर्स (Royal Indian Air Force)' म्हणून स्थापना करण्यात आली होती.
-
१९५० मध्ये त्याचे नाव 'भारतीय हवाई दल (Indian Air Force)' असे करण्यात आले होते.
IAF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय वायूसेना होय.
-
प्रमुख: विवेक राम चौधरी हे वायूसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.