-
दरवर्षी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
व्यक्ती, समुदाय आणि समाज या सर्वांकरिता असणारे साक्षरतेचे महत्त्व आणि अधिक साक्षर समाजाप्रती प्रखर प्रयत्न करण्याची असणारी आवश्यकता याबद्दल जनजागृती करण्याचे कार्य सदर दिवस करतो.
-
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस २०२० मध्ये 'कोविड-१९ संकट आणि त्यापलीकडे साक्षरता शिकवणे आणि शिकणे (Literacy teaching and learning in the COVID-१९ crisis and beyond)' या थीम अंतर्गत साजरा करण्यात येत आहे.
-
याद्वारे विशेषत: शिक्षकांची आणि बदलणार्या शैक्षणिक भूमिकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
सदर दिवसाची थीम ही साक्षरतेच्या दृष्टीकोनातून मुख्यत: तरुण आणि प्रौढांवर लक्ष केंद्रित करते.
-
१९६६ मध्ये युनेस्कोमार्फत ८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून जाहीर करण्यात आला होता.
युनेस्को (UNESCO) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्था प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO चे संस्था प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना झाली होती.