• भारतीय वायुसेनेतर्फे दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी 'भारतीय वायू सेना दिन (Indian Air Force Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२० मध्ये भारतीय वायुसेनेमार्फत आपला ८८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.

  • ८ ऑक्टोबर १९३२ रोजी ब्रिटीश राजवटीमध्ये रॉयल इंडियन एअर फोर्स (Royal Indian Air Force) म्हणून भारतीय वायुसेनेची अधिकृत स्थापना करण्यात आली होती.

  • १९५० साली सदरचे हे नाव बदलून 'भारतीय वायुसेना' असे करण्यात आले होते.

IAF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.

  • प्रमुख: राकेश कुमारसिंग भदौरिया हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.