-
दरवर्षी ८ मे रोजी 'जागतिक थॅलेसीमिया दिन (World Thalassemia Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
थॅलेसीमिया पीडितांच्या स्मरणार्थ तसेच या आजाराविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
-
'जागतिक थॅलेसीमिया समुदायातील आरोग्य असमानतेबाबत संबोधित करणे (Addressing Health Inequalities Across the Global Thalassaemia Community)' ही २०२१ च्या जागतिक थॅलेसीमिया दिनाची थीम आहे.
थॅलेसीमिया विषयी महत्वपूर्ण माहिती
-
थॅलेसेमिया हा अनुवांशिक रक्त विकार आहे.
-
या रोगात कमी हिमोग्लोबिन आणि सामान्य रक्त पेशींपेक्षा कमी पेशी असतात.