-
'जागतिक महासागर दिन (World Oceans Day)' दरवर्षी ८ जून रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
समुद्राचे महत्व तसेच त्याचे संरक्षण याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सामान्य लोकांना समुद्रावरील मानवी क्रियांच्या परिणामाबद्दल सांगणे, समुद्रासाठी जगभरातील नागरिकांची चळवळ विकसित करणे तसेच समुद्राच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जागतिक लोकसंख्या एकत्रित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
'महासागर: जीवन आणि रोजीरोटी (The Ocean: Life and Livelihoods)' ही जागतिक महासागर दिन २०२१ ची थीम आहे.