'जागतिक नगरनियोजन दिन (World Urbanism Day)' दरवर्षी ८ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो.

ठळक मुद्दे:

  • शाश्वत, सर्वसमावेशक तसेच राहण्यायोग्य समुदाय घडवण्यासाठी नगरनियोजन व प्रादेशिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ८ नोव्हेंबर रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
  • यंदाचा २०२६ सालचा या दिनाचा ७७ वा वर्धापनदिन होता.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'उत्तम समुदाय नियोजनावर आधारलेले असतात! (Great Communities Are Built on Planning!)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स विद्यापीठाचे प्राध्यापक कार्लोस मारिया डेला पाओलेरा यांनी १९४९ मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती.
  • 'आंतरराष्ट्रीय नगर आणि प्रादेशिक नियोजक संस्था (The International Society of City and Regional Planners)' ही संस्था जगभरातील आपल्या सदस्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून या दिनाचा प्रसार करण्याचे कार्य करते.