-
शांघाय सहकार संघटनेच्या (Shanghai Cooperation Organisation - SCO) सदस्य देशांच्या कायदा व न्यायमंत्र्यांच्या ७ व्या बैठकीचे भारतामार्फत व्हर्च्युअल स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे
-
भारतीय कायदा आणि न्याय, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
-
भारतामार्फत सदस्य देशांना व्यासपीठाच्या माध्यमातून उत्तम कल्पना, प्रथा आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यास आवाहन करण्यात आले.
-
सदर व्हर्च्युअल बैठकीला रशिया, चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांच्या न्यायमंत्र्यांनी हजेरी लावली.
-
सहकार्याच्या क्षेत्राबाबत या ७ व्या सत्रामध्ये चर्चा करण्यात आली.
SCO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SCO म्हणजेच Shanghai Cooperation Organisation अर्थात शांघाय सहकार संघटना होय.
-
निर्मिती वर्ष: २००१ साली SCO ची निर्मिती करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बिजींग, चीन हे SCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सरचिटणीस: व्लादिमीर नोरोव हे संघटनेच्या सरचिटणीस पदावर विराजमान आहेत.
-
सदस्यत्व: SCO चे ८ सदस्य देश आणि ४ निरीक्षक देश आहेत.